Ad will apear here
Next
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून...!


क्लिंट इस्टवूडच्या चित्रपटांचा प्रवास प्रदीर्घ, वैविध्यपूर्ण आणि अनपेक्षित असा आहे. ५० वर्षांमध्ये तो ५० चित्रपटांमध्ये झळकला आहे. आयुष्यातल्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना, त्याचा अर्थ शोधताना त्यानं एकदम वेगळ्या, न मळलेल्या वाटेनं पुढे जाण्याचं धाडस कायम दाखवलं. रॉबर्ट फ्रॉस्टची the road not taken कविता त्याला सदैव प्रेरित करत असावी.

१९३० सालच्या अमेरिकेतल्या महामंदीनंतर तो कॅलिफोर्नियामध्ये स्थिरावला. फार सावकाश बोलतो म्हणून त्याला अभिनेत्याच्या स्क्रीन टेस्टमध्ये नाकारलंही होतं. 

१९६०च्या दशकात सर्जिओ लिआॉन या दिग्दर्शकाच्या डॉलर सीरिजमधला (for a few dollars more, the good the bad and the ugly etc.) तो अनामिक माणूस इस्टवूडला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन गेला. पाश्चात्य चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये बहुतेक जण एन्रिको मॉरिकॉनची तुफान गाजलेली ट्यून म्हटल्यावर nostalgic होतात. हॉलिवूडपटांची एक वेगळी, स्वतंत्र ओळख त्याच्यामुळे जगभर पोहोचली. त्याआधी जॉन वेननं गाजवलेल्या पाश्चात्य चित्रपटांमधले नायक हे जरा तरी मानवतावादी, सहिष्णू होते. इस्टवूडचा नाव नसलेला नायक हा comparatively ruthless होता. तो जाईल तिथे फक्त त्याचा कायदाच चालायचा. अमेरिकेतल्या बदलत्या सांस्कृतिक मूल्यांचं प्रतिनिधित्व तो करतो. 



यादरम्यान रॉहाइड या टीव्ही मालिकेत इस्टवूडनं चिक्कार पैसे मिळवले.

For a few dollars more साठी १५ हजार डॉलर्सवर काम करणाऱ्या इस्टवूडनं where eagles dare साठी साडेसात लाख डॉलर्सचा करार केला होता.

यानंतरच्या ‘डर्टी हॅरी’ या मालिकेत तो गुन्हेगारीच्या उलट्या बाजूला गेला. गुन्हे करणारा डॉलर सीरिजमधला नायक आता गुन्हेगारांना पकडणारा इन्स्पेक्टर होता. या त्याच्या भूमिका लोकांना पसंत पडल्या.



Play misty for me हा त्याचा दिग्दर्शक या नात्यानं पहिला चित्रपट. यात मानसिक द्वंद्व आहे. इथे त्यानं त्याला हवी ती कात टाकलेली दिसते. ‘मिस्टिक रिव्हर’ या त्यानं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात बालपणीचे प्रसंग उत्तर आयुष्यात कसे त्रास देतात, व्यक्तिमत्त्वच कसं बदलतात ते दिसतं. A perfect world चित्रपटामध्ये स्टॉकहोम सिंड्रोम आहे. (अपहरणकर्त्याच्या प्रेमात पडणं.. उदा. हायवे हिंदी चित्रपट)

Gran Torino मध्येही trobled past असणाऱ्या माणसाचं परिवर्तन दिसतं. याच थीमवर Finding Forrester हा शॉन कॉनरीचा चित्रपटही मस्त आहे. Flags of our fathers मध्ये दुसऱ्या महायुद्धातल्या जपानमधल्या जिमा बेटावरच्या संघर्षाची कथा आहे.

Every which wat but loose मध्ये विनोदी भूमिकाही त्याने मस्त केलीय. ब्रीझी या चित्रपटावर Lolita चा प्रभाव आहे. मध्यमवयीन माणूस / टीनएजर मुलगी यांच्यातलं उमलतं प्रेम यात दिसतं.

Million Dollar Baby हा अनेकदा पाहून समजावून घ्यावा असा चित्रपट आहे. स्वत:च एका त्रासदायक भूतकाळाला सामोरा गेलेला यातला नायक एका बॉक्सरमध्ये ऊर्जा भरतो. ती विचित्र अपघातात कोसळल्यावर तिला अनेकदा आत्महत्येपासून वाचवतो; पण अखेरीस तिची तडफड त्याला बघवत नाही. क्लिंट इस्टवूडनं या भूमिकेचं सोनं केलं आहे. या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासाठी मिळालेलं आॉस्कर सार्थ आहे. यातला मॉर्गन फ्रीमन अनुभवायला हवा.

Honkytonk Man मध्ये तर जिमी रॉजर्स या अमेरिकन संगीतकाराच्या आयुष्यावर बेतलेली व्यक्तिरेखा इस्टवूडनं साकारली. यानंतर तो मृदू, हळव्या भूमिकांमध्ये जास्त दिसत गेला. चार्ली बर्ड पार्कर या जॅझ संगीतकाराच्या आयुष्यावर त्यानं ‘बर्ड’ काढला. जॅझची त्याची आवड bridges of the madison county मध्येही दिसते. इस्टवूड स्वत: उत्तम पियानिस्ट आहे. त्याच्या चित्रपटांमधलं संगीत लक्षणीय का वाटतं त्याचं उत्तर इथेही त्याला असलेलं संगीताचं ज्ञान आणि आवड यात आहे.

Bridges of madison county हा माझा लाडका चित्रपट. आयुष्याच्या वळणावर असं एखादं तरल स्वप्न अलगद लाभावं आणि ते स्वप्न म्हणूनच चिरकाल टिकावं असं कोणाला वाटत नाही? या चित्रपटात वेगळं व्हायचं, तेच श्रेयस्कर आहे असं ठरल्यानंतरही तो तिला एका बाजारात भेटतो. तिच्या गाडीसमोर गाडी थांबवतो. पावसाळी, धुरकट वातावरणात तो त्याच्या गाडीतल्या आरशाभोवती तिनं दिलेलं लॉकेट अडकवतो.. आयुष्य उधळून द्यावं असं वाटत असूनही आपल्या नवऱ्याबरोबर असलेल्या फ्रान्सेस्काची असह्य वेदना कॅमेऱ्यात दिसते; पण केवळ हावभावांनी त्याची वेदनाही जाणवून आपल्याला घुसमटल्यासारखं होतं.

भटका, एकाकी असणारा रॉबर्ट किंकेड जेव्हा त्यातल्या फ्रान्सेस्काच्या प्रेमात पडतो, तेव्हाचा त्याचा अभिनय हेलावून टाकणारा आहे. त्या दोघांमध्ये असणारं नातं ज्या माणसाला समजू शकतं त्याला स्त्री-पुरुषांमधल्या नात्यांमधल्या भावबंधाला असणाऱ्या असंख्य बाजू कळू शकतील. अरुण साधूंच्या शोधयात्रामध्ये शशी/श्रीधर हे असंच एक नातं आहे.



अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजा भागवणारा मानव उत्क्रांत होत गेला तशा दया, करुणा अशा उन्नत समजल्या जाणाऱ्या सकारात्मक भावना त्याच्यात रुजत/दृढ होत गेल्या. तसं इस्टवूडनं सुरुवातीच्या चित्रपटात गुन्हेगार, मग इन्स्पेक्टर आणि नंतर मानसिक गुंतागुंत जाणणारा, दया, करुणा, प्रेम आणि मदतीचा हात पुढे करणारा नायक रंगवला. त्याचं एक कोटेशन इथे देण्याचा मोह आवरत नाही.. 

‘There's a rebel lying deep in my soul. Anytime anybody tells me the trend is such and such, I go the opposite direction. I hate the idea of trends. I hate imitation; I have a reverence for individuality.’

- नीलांबरी जोशी


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EUVVCU
Similar Posts
उत्खनन १९३९च्या मे महिन्यात उत्खनन करणारा बेसिल ब्राउन एडिथ प्रिटी या महिलेच्या ‘सफोक’ या इंग्लंडमधल्या परगण्यात खोदकाम करायला हजर होतो. पुरातत्त्वशास्त्रातलं आजतागायत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं एक उत्खनन तो करतो. ‘द डिग’ या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ही मध्यवर्ती संकल्पना. हा चित्रपट
‘पेले’ डॉक्युमेंटरी : ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहास ‘तो देशाचा विजय होता. तो (फुटबॉल या) खेळाचा विजय नव्हता...’ ‘पेले’ या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये १३६३ गेम्समध्ये १२७९ गोल करणारा पेले स्वत: हे शेवटचं वाक्य म्हणतो. यामागचे संदर्भ ती डॉक्युमेंटरी पाहताना कळत जातात.
असा प्रीतीचा नाद अनाहत..! चित्रपटाच्या शेवटी ‘पण हे सगळं करून तू आनंदात राहशील का’ या जेरीच्या प्रश्नावर शार्लोट म्हणते, ‘आपल्या दोघांनाच जाणवणारा आपल्यातल्या प्रेमाचा तो मंतरलेला प्रदेश आपल्यात जिवंत असताना, प्रेमाचा अनाहत नाद आपल्याला ऐकू येत असताना, फक्त आपल्या नजरेला दिसणारा चांदण्यांचा झिलमिलता प्रकाश समोर असताना आपण चंद्राची
बाँबे रोझ : उत्कट भावस्वप्न मांडणारा अॅनिमेशनपट ‘मुंबई’ या गुलजारच्या कवितेतल्या ओळींसारख्या ‘बाँबे रोझ’ या (नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या) अॅनिमेशनपटातल्या व्यक्तिरेखा प्रत्येक फ्रेममध्ये रंगांच्या छटा आणि भावच्छटा घेऊन साकार होत जातात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language